विणकर दिन विशेष
7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय विणकर दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विणकर उद्योगातील कामगारांना ट्विटर द्वारे शुभेच्छा दिल्या.
सद्याच्या युगात सर्वच व्यवसाय टेक्निकल पद्धतीने होत आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अवगत होत चालले आहे. सुरुवातीच्या काळात विणकाम करून वस्त्र निर्माण करताना, हाताच्या सहाय्याने धोटे फेकावे व दुसऱ्या हाताने झेलावे लागत होते. या काळात एक नववारी साडी तयारक करण्यासाठी जवळपास ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागत होता. पुढे विणकाम शटल आले. या पद्धतीमध्ये धोटे एकीकडून दुसरीकडे वेगाने धावत असे. त्यामुळे किमान दररोज एक विणकर मजूर एक साडी विणत होता. परंतु, बदलत्या काळाबरोबर बारिक सुताच्या वस्त्रांची मागणी होऊ लागली आणि विणकाम व्यवसायातही बदल करावा लागला. ४० बाय ४०, ६० बाय ६०, ८० बाय ८० या प्रकारच्या सुतापासून काठपदर असलेली साडी बनवण्यात येऊ लागली. नगरच्या विणकाम व्यावसायिकांनी आपल्या घरी, कारखान्याजवळ साडी सेंडर सुरू केले. हळूहळू ही वस्त्रे खासकरून साडी ‘अॅटोमॅटिक टेक-अप मीशन’ या पद्धतीच्या प्रगत विणकाम केल्या जाऊ लागली.
आजच्या ऑनलाइन शॉपिंगच्या काळातील विणकाम व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात खप होऊ शकतो, हा व्यवसाय दिवसेंदिवस लुप्त होत असताना पाहायला मिळतो. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयच्या वतीने अनेक गोष्टीची कामगारांना मदत होऊ शकते. देशातील जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय आहे, असे विणकाम उद्योजकाचे म्हणणे आहे. तसेच ग्रामीण भागातील विणकाम कामगारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते सद्यस्थितीत कापड उद्योगाचे स्पर्धा वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे विणकाम उद्योगांना चालना मिळू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank u so much