*देश संकटात असताना, धार्मिक रंग देणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही* .
सर्वप्रथम या लेखातून मी कोणालाही उद्देशून किंवा कोणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नाही. मात्र खेद वाटतोय सद्यस्थितीतीला डोळसपणे पाहताना, "सर्व धर्म समभाव" या वाक्याचा अर्थ समजून घेत असताना मनात अनेक प्रश्नचा संचय होतो. देशात आलेल्या महामारीला एकजुटीने लढा देण्यापेक्षा धार्मिक रंग देणे? कितपत योग्य वाटतं या हारामखोरांना. आपण एकत्र लढलो तर जिंकू मग हे आपसातील वादाचे काय लोणचे करायचे का? इथे प्रश्न कोणत्याही एका घटकाचा नाही, कोणत्याही विशिष्ट धर्माचा नाही, संकट हे सकल मानव जातीवर आलेलं आहे. याचा विचार होणे काळाची गरज बनली आहे.
देशात सध्या Covid - 19 या आजाराने थैमान घातले आहे. याचा सामना करताना सरकार , राजकीय नेते मंडळी, सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करत आहे. अश्या परिस्थितीत जातीधर्माच्या नावावर वाद घालणे निर्थकच!
भारत देशामध्ये सर्व धर्मातील लोक राहतात. त्यामुळे छोटे-मोठे वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र अश्या परिस्थितीत एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना भडकवून आपण देशाला अधिक संकटात नेत आहोत. याला जबाबदार सर्व भारतीय नाहीत. काही विशिष्ट महाभागांना राजकीय स्वार्थपोटी असे कृत्य सुचतात. सर्व भारतीय गुण्या- गोविंदाने नांदणाऱ्या या देशात धार्मिक भावना भडकावून तडा निर्माण होत आहे. मग ही पोकळी भरून काढायला बरेच दिवस लागतात. इंग्रज भारतावर राज्य करीत असताना सर्व आपण सर्व भारतीयांनी एकत्र लढून इंग्रजांपासून मुक्ती मिळवली. त्यावेळेस पुढे आले ते सर्व भारतीयच. याचेच अनुकरण करत याच परिस्थितीवर एकत्र मिळून मात केली तर विजय निश्चितच मिळेल.
जातीय अस्मितेच्या प्रश्नामुळे बनलेल्या परिस्थितीत हिंसक घटना वाढल्या आहेत. काही विशिष्ट समाजाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून वैर भावना भडकवल्या जात आहे. अश्या घटनांमध्ये गटातील गरीब, दुर्बल नागरिक बळी पडताना दिसतात. या दडपल्या जाणाऱ्या नागरिकांना मदत करणे आणि आधार देणे हे प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकांचे कर्तव्य आहे. जेणेकरून अत्याचारग्रस्त नागरिकांना सुरक्षित वाटेल आणि समाजातील सामंजस्य टिकेल.
आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर अश्या थोर महामानवांच्या कर्मभूमीत वावरत असताना कुठेतरी या महापुरुषांचे विचार बाजूला ठेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी देशाला धर्मा-धर्मातील वादामध्ये अडकवणाचा प्रयत्न सतत होत असतो. असे प्रश्न सद्यस्थितीत उभे राहिले आहेत असे नाही. देशामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटात असे प्रश्न नेहमी उभे असतात. राजकीय हस्तक्षेप होत जातात, धर्मा- धर्मातील वाद उसळत जातात, समाजामध्ये तेढ निर्माण होते. मग या कारणामुळे परिणामी विकृतीला सामोरे जावे लागते. जणू ते आपले कर्तव्य विसरलेच, आणि भरारी घेताय ते स्वतःचे हित जपण्यासाठी. पण अश्यामुळे साध्य तरी काय होत असेल आणि अस्थीत्व टिकणार तरी किती दिवस? मग अशी विकृती करण्याचा काय फायदा? अति तिथे माती होतेच आणि परिणामी त्या मातीलाही मोल राहत नाही.
आपण भारतातील सुजाण नागरिक आहोत. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून या परिस्थितीत एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. तसेच सोशल मीडियावर व्यक्त होताना भावनिक तेढ निर्माण होणार नाही. याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यामुळेच आपण सर्व भारतीय जगासमोर वेगळा दृष्टिकोन बदलेल.
-- केतन कोलते
मो. ७७६९८८२६१२
औरंगाबाद ..

मस्त लिहलंय👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाउत्कृष्ट लिखाण 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाMast लिहिलय दादा
उत्तर द्याहटवादादा धन्यवाद
हटवाखुप छान 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखुप छान 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा