सोमवार, २० एप्रिल, २०२०

कविता करता आली नाही म्हणून काय झालं ......

कविता करता आली नाही म्हणून काय झालं,
माणूस म्हणून जगता आलं इतकं का कमी झालं,

नाही सुचले शब्द म्हणून काय झालं,
समोरच्याला चांगलं बोलून आपलंसं करता आलं इतकं का कमी झालं,

नाही जुळल्या कवितेच्या चार ओळी म्हणून काय झालं,
आपली नाती - गोती  निभावता आलं इतकं का कमी झालं,

यमक जुळणाऱ्या ओली नाही लिहता आल्या म्हणून काय झालं, आयुष्याचे गणित जुळवता आलं ,इतकं का कमी झालं,

नाही मिरवता आले कवी म्हणून, तर काय झालं,
आपल्या कर्तृत्वातून ताट मानेने जगता आले, इतकं का कमी झाले.....
 
            --  केतन कोलते




१० टिप्पण्या:

Thank u so much

बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

  बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय               कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व था...