महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 जयंती
महामानव यासाठीच आजही भारत देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो. आज या बाबासाहेबांची जयंती, अर्थात समाजातील सर्वच घटकासाठी आनंदाचा आणि त्याच्या प्रति कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस.
प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात आपण जयंती साजरी करतो. यावर्षी कोरोना सारख्या महामारीला देश सामोरे जात आहे, त्यामुळे ही जयंती घरीच साजरी करावी लागणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसार केला ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकजण कोणत्या कोणत्या मार्गाने आपली कृतन्यता व्यक्त करताना दिसतोय. सांगायचे हेच की घरी राहून सुद्धा आपण चागल्या प्रकारे बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना उजाळा घालतोय. प्रशासन आणि सरकारी सूचनांचे पालन करत आपण सर्वजण अद्भूतपूर्ण जयंती साजरी करतोय याचा आनंद आहे.
वर्षभरातील 365 दिवसामध्ये आपण संविधानाला धरून चालतो. त्याचप्रमाणे समता,न्याय,बंधुता, एकता, स्वातंत्र्य असा अनमोल ठेवा बाबासाहेबानी दिला. कदाचित याच विचार तुम्हा- आम्हाला जवळ करण्यासारखा आहे.
अश्या या महामानवाला विनम्र अभिवादन 💐💐
- केतन कोलते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank u so much