शुक्रवार, २९ मार्च, २०१९

मनातील माणसं

आयुष्याच्या या खडतर वाटेवर चालत असताना त्या प्रेमाच्या माणसांना विसरणे कठीण होते. काही काळापुरता त्याचा सहवास जणू मनामध्ये घर करून बसतो. तशी व्यक्ती भेटणे तर कठीणच!
                सोबत मारलेल्या गप्पा, केलेला टाइमपास या गोष्टी तर आठवतातच पण त्याचबरोबर या सर्व गोष्टी करताना झालेला त्रास विसरणे कठीणच! त्या नात्यासाठी नाव नाही मात्र ते नातं टिकवण्यासाठी प्रचंड प्रयत्न. एका व्यक्तीने नातं टिकवणं जरा कठीणच असत बरका. पण आपलं काय आपण फक्त जे होईल ते करायचं. उगाच भरकटुन जायचं नाही म्हणून नेहमी गप्पच. अस का होऊ नये की आपल्याला थोडी काळजी वाटणं,थोडं प्रेमाचं बोलणं, आपलं फक्त तेच जे मनाला पटेल तेच करायचं. बाकी आहेच की बघायला.
     मग वेळ निघून गेल्यावर , आपल्या मनामध्ये बऱ्याच आठवणी दाटून येतात. मात्र त्या गप्पांच्या नाही तर आपल्यासाठी कोणी विशेष परिश्रम घेतले असतील याचीच जास्त आठवण आपल्याला येत असते. अस म्हणतात ना की आपल्यासाठी कोणी काही करत असले की आपल्याला त्या व्यक्तीची त्याकाळी जास्त महत्त्व नसते. आपल्या दोन आपुलकीचे शब्द देखील  जास्त असतात त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी. पण तिथेच आपण घोडचूक करून बसतो. मग मनाला मारण्यापलिकडे कोणताही पर्याय आपल्याकडे नसतो. पण असं का व्हावं.
                   अशी जिव्हाळ्याची माणसं प्रत्येकाच्या नशिबी नसतात.पण ज्याच्या असतात त्याला किंमत नसते.कायम स्वरूपी आपण सोबत राहू शकत नाही तरीसुद्धा इतकं प्रेम, आपुलकी, विश्वास या गोष्टी असंण म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आज खंत वाटते, पण वेळ निघून गेल्यावर.

                   -- केतन कोलते
                        

८ टिप्पण्या:

Thank u so much

बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

  बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय               कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व था...