सरस्वती भुवन मा. व उ. विद्यालय - माझ्या आयुष्यातील एक प्रवास
लहान असताना आपला पाया भरून काढण्याचे काम माध्यमिक जीवनातील शाळा करते. आपल्यावर चांगले वाईट संस्कार हे देखील शाळेतून होतात. या शाळेतील प्रवास म्हणजे माझं रमलेलं बालपण. आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची भरारी घेताना, शिक्षणातील पुढचे पाऊल उचलताना या शाळेतील दिवस खूप महत्वाचे आणि आठवणींचे आहे. हे दिवस आठवल्यानंतर माझ्या बाळमनावर हसू येत. मग असे कसे होतो आपण हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मी सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत प्रवेश घेतला. इयत्ता 5 वी ते 9 वी हे शिक्षण याच शाळेत पूर्ण केलं. पहिल्याच दिवशी वडिलांनी वर्ग दाखवून दिला आणि म्हणाले तुला आता इथेच बसायचं आहे. तो पहिला दिवस वडिलांचा शाळेत येणाचा त्या नंतर थेट टीसी काढायलाच आले. शेवटी विश्वास होता आता काही शाळेत येऊन बघायची गरज नाही करत आपलं पोरगं अभ्यास.
शाळेत असताना इंग्रजी म्हणजेच न सोडवता येणार गणित होत. आणि आमची पहिलीच बॅच होती, शाळेत सेमी इंग्रजी सुरू झालं. सेमी इंग्रजीच्या वर्गात कोण कोण बसणार यासाठी एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत नापास होणारा मी विद्यार्थी. पण बसवलंच मला त्या वर्गात. पण इंग्रजीची भीती पाठ सोडत नव्हती. पहिलाच तास विज्ञान विषयांचा सुरू झाला, त्यात मास्तर नी भडाभडा इंग्रजी बोलायला सुरू केलं, जणू पाठ करून भाषण दिल्यासारखं, मी फक्त त्याचे हाव-भाव बघत होतो. जाताना सर बोलले इंग्रजीला घाबरू नका खूप सोपी आहे बरं. इतकं वाक्य तरी निदान माझ्यासाठी मराठीत बोलले असं मला वाटू लागलं.
सुरुवातीला सर्व काही नवीन होतं, काही किलोमीटरचा प्रवास करून शाळेत यायचं, दुपारच्या सुट्टीत सर्वांनी एकत्र पळून जायचं, रस्त्यांनी धिंगाणा घालत यायचा, दुपारच्या सुट्टीत पकडापकडी खेळायचं, हा नित्यक्रम अगदी पाच वर्षे सुरुच राहिला.
शाळेत असताना बऱ्याच गोष्टी घडल्या जे की आता आठवून खूप हसू येत. आणि त्याचा उल्लेख पण करू शकत नाही.
मी वर्गातील अति साधारण हुशार असलेला विद्यार्थी होतो. अभ्यास करण्याचा तर फारच कंटाळा होता, म्हणून जे सर मारतात त्याचाच अभ्यास करायचो. सर शिकवत असताना मनात फार प्रश्न पडायचे, आजही पडतात पण त्या काळी कधीच धाडस झालं नाही, ज्या दिवशी हे धाडस झालं त्याच दिवशी मी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.
मी शाळा सोडण्याचे कारण :
मी इयत्ता 9 विला असताना गवळी सर तास घेत होते. सर फार अभ्यासपूर्ण शिकवायचे पण त्याच्या तासाला मुलं फार गोंधळ घालायचे, जास्त आवाज याच सरांच्या तासाला वर्गातुन येत असत. यासाठी सरांना दोन मेमो सुध्दा भेटले होते. सर शिकवत होते पूर्वी लोक देवाण-घेवाण पद्धतीतून आपले व्यवहार करत असत. म्हणजेच त्या काळी पैसा नव्हता म्हणून असं केल्या जायचं. मी उभा राहिलो आणि सरांना विचारलं की "सर मग पैशाचा शोध कधी लागला" हे माझं पाच वर्षातील पहिलं धाडस होतं. मी हा प्रश्न विचारल्यानंतर एका सरांनी वर्गात डोकून पाहिलं, मुलं ओरडत होती, मी उभा होतो. सरांनी वर्गात पाहिल्यावर सगळे शांत झाले. मला त्यांनी उभं केलं आणि म्हणाले 'पैशाचा शोध कधी लागला हे माहीत करून तुला म्हशी घायच्या आहे का' ? हे ऐकून मनात खूप राग आला. वर्गात माझा केलेला अपमान हा मला सहन झाला नाही. आजही मनात राग कायम आहे, आणि त्याच दिवशी निर्णय घेतला शाळा सोडायची आणि मी तसंच केलं. हे घडायला होत किंवा नाही हे मला माहित नाही. पण असं म्हणतात जे काही होत ते चांगल्यासाठीच होत. पण या शाळेनं मला दिलेले संस्कार, शिक्षण, मित्र हा ठेवा मला आयुष्यभर पुरेल. आणि या गोष्टी मला न विसारण्यासारख्या देखील आहे. ही शाळा माझ्या आयुष्यभर स्मरनिय राहील.
-- केतन कोलते