राजे तुमच्या जयंतीची तयारी जोरदार सुरू आहे बरका!
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द ऐकल्यावर अंगावर सर्रकन काटा येतो. तुमचं धाडसी, पराक्रमी रूप अनेकांना प्रेरणा देऊन जातं. कदाचित यामुळेच तुमची जयंती साजरी करण्यात कोणी कमी पडणार नाही. राजे तुमची जयंती जवळ आलीये तयारी मात्र जोरात सुरू आहे बरका. नवमाध्यमामध्ये तुमचेच फोटो दिसताय. लहान मोठी मूल भाषणाची तयारीला लागलीये. सगळ्या गोष्टींचा पारूख ठरलंय राजे, तुमचे मावळे तुमची वाट पाहताय राजे.
तुम्ही लहान पणापासूनच पराक्रमी होता. तुम्हाला घडवण्यामध्ये जिजाऊनी कोणतीही कसर सोडली नाही हे आम्हाला विसरून चालणार नाही. तुम्ही कदाचित तुमचं स्वराज उघड्या डोळ्यांनी पाहत असालच. फक्त त्यावेळी राजेशाही आणि आता सरकार शाही सुरू आहे बाकी काही नाही.
राजे तुमची वाट कोण पाहत नाही. तुमच्या नावावरच हा महाराष्ट्र टिकून आहे. मग का हो तुम्ही परत येत नाहीत. तुम्ही परत यावे यासाठी काय तरी करावे लागेल याचे उत्तर तरी द्या राजे. तुमच्या सुजलम- सुफलमं राज्यात तुमची सर्वत्र गरज भासतीये. तुम्ही अचानक निघून गेलात ही बातमी देखील गुपित ठेवावी लागली, यातच तुमचं सामर्थ्य दिसून येत. इथं काम तर सगळेच करताय, पोटही सर्वाचं भरतंय मात्र पद्धत बदलली आहे इतकंच.
तुम्ही होतात तर इथल्या प्रजेचा आशावाद टिकून होता. तुमचं प्रजेवरच प्रेम पाहुन अनेकांनी प्राणाची आहुती दिली. तोच आशावाद मात्र आता उरला नाही. मग आशा करायची कोणाकडून आणि जीव तरी कोणासाठी द्यायचा हा प्रश्न उरतोच राजे तुमच्या मावळ्याकडे.
राजे तुम्ही आजही लहान थोराच्या स्मरणात आहात. तुमची जागा कोणीही घेऊ शकलं नाही, म्हणूनच तुमचे मावळे तुम्हाला देवाचे रूप मानतात. या सर्व गोष्टींचा विचार करता तुमच्या जयंतीला जोरदार तयारी सुरू आहे राजे.
-- केतन कोलते

जय शिवराय🚩🚩🚩
उत्तर द्याहटवाजय शिवराय
हटवाNice bro khup chhan lihlay as vattay bhavi लेखक होईल good thought and best wishes to you
उत्तर द्याहटवाThank u so mach
हटवाJay shivray
उत्तर द्याहटवाJay shivray
हटवाjay shivray
उत्तर द्याहटवाmast lekhan
उत्तर द्याहटवा