रविवार, १ मार्च, २०२०

   तिला आवडायचं ........

तिला देवळात जायला आवडायचं,
ती देवाला हात जोडायची,
आणि मी देवाला तीच प्रेम मागायचे !!

तिला बागेत फिरायला आवडायचं,
ती मानसोप्त बागेत फिरायची,
आणि मी तिच्यात रमून जायचो ll

तिला आवडायचं मनसोक्त गप्पा मारायला,
ती सांगायची मला रोजचे घडलेले किस्से,
आणि मी तिच्यात रमण्याचे स्वप्न पाहायचो ll

तिला आवडायचं पावसात भिजायला,
ती पावसात ओली चिंब व्हायची,
आणि मी तिच्या प्रेमात न्हाऊन निघायचो ll

तिला आवडायचं इतरांची मदत करायला,
ती सदैव मदतीसाठी हात पुढे करायची,
आणि मी तिच्या संकटाना सामोरे जायचो ll

होती ती वेडी, खोडकर आणि दयाळू,
पण खूप प्रेमळ,
तिला मी आवडायचो आणि मला ती ......
 
 (तळटिप : या कवितेशी माझ्या वयक्तिक काहीही संबंध नाही आढल्यास तुम्ही तुमच्या घरी सुखी रहा )
 
                                -- केतन कोलते




बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

  बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय               कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व था...