सहज चहा घेण्याच्या निमित्ताने माझा मित्र आणि मी भेटलो खुप दिवसानंतर भेट झाली म्हणून एकमेकांचा हाल हवाला आम्ही विचारत होतो. तो बाहेर गावी शिक्षण घेत असल्यामुळे सध्या काही भेटणं होत नाही. म्हणून मी त्याला म्हटलं चल कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला., खरं तर त्याचे उत्तर ऐकून मला खूप हसू आलं. पण काय करणार
मी : तुला दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत तर निवांत कुठेतरी बाहेर जाऊ त्या निमित्ताने निवांत गप्पा मारता येईल.
मित्र : हो जाऊ ना पण मी ना तुला विचारून सांगतो.
मी : घरी पप्पा ला विचारतो का ?
मित्र : नाही
मी : मग आईला सांगतो का ?
मित्र : नाही रे
मी : मग आता कोणाला विचारून सांगणार आहेस तू ?
मित्र : समजून घे ना भावा थोडं
मी : मला नाही समजलं रे सांग ना
मित्र : मी कोणाला विचारून सांगणार असेल माहिती आहे ना तुला.
मी : नाही रे मला खरंच समजलं नाही तू कोणाला विचारून सांगणार आहे ते,
( तो सांगायला खूप टाळत होता पण आम्ही फार जवळचे मित्र असल्यामुळे मला तर सांगावं लागणार होतं त्याला )
मी : जाऊदे नको सांगू
( मी कुठल्याही प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करता त्याला बोलून टाकलं )
मित्र : भावा "" तिला विचारून सांगतो रे ""
मी : निशब्द .......
खरं तर मला खूप हसू आलं पण मी न काही बोलता शांत बसणं पसंत केलं मग तोच बोलायला लागला भावा तुला कसं सांगू? मला प्रत्येक गोष्ट विचारुन करावी लागते रे. फार रागीट आहे ती. आणि याच गोष्टीवरून आमचे खूपदा भांडण देखील होतात. मला मात्र आता त्याच्या दुःखात सहभागी व्हावं लागलं. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न देखील केला. त्याने तर मग पूर्ण त्याच दुःखाच गाठोडं माझ्यापुढं ठेवलं.
खरं तर स्वातंत्र्य कोणाला नको हवं असत. स्वातंत्र्य अशी गोष्ट असते ती मानवाला अधिक प्रिय असते. प्रेम, लावलेला जीव अश्या सर्व गोष्टी स्वातंत्र्य न दिल्याने निरर्थक ठरत असतात. मग मतभेत, भांडण अश्या गोष्टीना सामोरे जावे लागते. कोणत्याही नात्याला माझा विरोध नाही. पण काही गोष्टीसाठी विचारून निर्णय घेणे घ्यायला दुमत नाही. पण जर त्या निर्णयासाठी आपण आपल्या घरच्यांचा, मित्राचा, आपण छंद जोपासत असलेल्या सर्व गोष्टींचा विचार केल्या जात नसेल तर कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार निर्माण होतो. आपल्याला कधी कधी आपल्या घरच्यांचा राग येतो कारण ते आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागू देत नाही अगदी त्याचप्रमाणे जर सर्व गोष्टी विचारून होत असेल तर भांडण, मतभेद होण्याचा दिवस नक्कीच येतो.
मग पुढे काय झालं हे सांगायला मला आवडणार नाही तरी पण सांगतो, नेहमी मला हसवणारा माझा मित्र माझ्याजवळ रडत होता आणि त्याचे डोळे पुसण्या पलीकडे मला देखील पर्याय नव्हता................
©- केतन कोलते
