बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

मला आवडणारी ती


               जे सगळ्यांच्या  बाबतीत घडत असतं तसं आपल्याही बाबतीत कधी कधी घडत  तसंच सेम टू सेम म्हणायला हरकत नाही असंच माझ्या बाबतीतही घडलं. ते असं ;
              कॉलेजला पहिल्या वर्षाचे ऍडमिशन झाल्यानंतर ती मला भेटली. खरंतर तिला मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न देखील केले. कुठेतरी माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर ति मला भेटली. कॉलेजला माझा पहिला दिवस आणि तिच्या सहवासातील पहिला दिवस मी अनुभवला. पहिला दिवस असल्यामुळे तिच्या जवळ जायला थोडा घाबरलो लक्ष विचलित झालं लेक्चर सुरू होतं आणि मी मला जागा शोधून बसलो माझा आवडता कलर जर कुठे असेल तर ती गोष्ट मला आवडायला लागते.  सर्वप्रथम त्या कलर मुळे मी जास्त तिच्याकडे आकर्षित झालो 'गुलाबी आखे'  हे गाणं देखील मी गुणगुणायला लागलो.
                 एखाद्याच्या मनामध्ये जशी आपली जागा  असते तशी मीही माझी जागा शोधली. आता तिच्या सहवासात राहायचे आहे, म्हणून तिची काळजी घ्यायला देखील मी सुरुवात केली. मला तर ती खूप आवडली माझ्या मनस्थिती नुसार मी तिच्यासोबत वागत गेलो, पण तिला मी आवडत असेल या प्रश्नाचे उत्तर कोण देईल कारण प्रत्येक गोष्टीला संवेदना नसतात ना !!
                     या आधुनिक युगात वावरत असताना ती कशीही असो पण तिच्या सहवासात मी जे काही  घडलो ते मात्र अविस्मरणीय राहील.  तिच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली तिच्या सहवासात राहून एक वेगळी ऊर्जा, मोकळा सूर्यप्रकाश, शुद्ध हवा या सर्व गोष्टी मला तिची आठवण करून देत असतात. तिच्या सहवासातील काही फोटो माझ्या मित्रांनी देखील पाहिले. त्यांनाही  ती खूप आवडली, आणि मी तिच्या सहवासात राहतो हे त्यांना सांगायला ही मला चांगलं वाटायचं.
              तिच्या सहवासातील एक वर्ष संपत आलं होतं आणि तिला निरोप देण्याची वेळ आली होती. दुःख देखील वाटत होतं पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तिच्या सहवासात जाईल  हा निर्णय घेऊन तिच्या  दुःखातून बाहेर आलो तिच्या बाबतीतलं ते वाक्य जे आमच्या सरांकडून तसेच मॅडम आणि इतरांकडून निघायचं आता तेव्हा ते देखील माझ्या तोंडातून निघायला लागलं होतं ते वाक्य म्हणजे "आम्ही सगळे याच क्लासरूममध्ये बसायचो आणि ती आमची जागा होती"

                       -- केतन कोलते

बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

  बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय               कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व था...